चंप्या सुखनिद्रेत निमग्न होता. अचानक बिछान्यावर प्रकाश पसरल्यानं दचकून तो जागा झाला. पाहतो तो रेड्यावर स्वार झालेले यमराज बेडरूममध्ये उभे. भयानं त्याचीबोबडीच वळली. प्रसन्न हसून यमराज म्हणाले, ”घाबरू नकोस चंप्या. मी तुला गुड न्यूज द्यायला आलो आहे. आणखी २० वर्षे तू ठणठणीत राहणार आहेस. मृत्यू तुझ्या केसालाही स्पर्श करणार नाही. अरे झोपलायस काय इथे ? जा, बाहेर जा. मजा कर. ही आनंदाची बातमी मस्तपैकी सेलिब्रेट कर.” यमराज अदृश्य झाले. चंप्याने तात्काळकपडे बदलून बाहेर धाव घेतली. आनंदानं वेडा होऊन तो रस्त्यातून नाचतच चाललाअसताना एक ट्रक सुसाट वेगानं आला आणिचंप्याला चिरडून गेला… … स्वर्गनरकाच्या प्रवेशद्वारावर यमराजाशी गाठ पडताच चंप्यानं कळवळून विचारलं, ”का खोटं बोललात माझ्याशी? . का?”. . . . . .यमराज ओशाळून म्हणाले,”सॉरी यार! मार्च एन्डचं प्रेशर असतं… काही करून टार्गेट पूर्ण करायचं असतं!!!
----------------------------------------------------------------------------------------------
----------------------------------------------------------------------------------------------
0 comments: