त्याला आठवतेय
ती कातरवेळ ……
तीच लग्न होत
दोन दिवसानंतर
म्हणून ती आलेली
शेवटच्या भेटीसाठी
त्या कातरवेळी
प्रेमाची गाठ सोडण्यासाठी
त्याला म्हणाली ती
झालं गेलं विसरून जा
तुझं माझ्यावर
माझं तूझ्यावर
जे प्रेम होतं
ते सगळ खोट होतं.
तो सुन्न.
ती कातरवेळ सुन्न.
बोलताना सार कडवट बोलून गेली
त्याला माहित होत
त्याने तीचा तिरस्कार करावा
म्हणून मुद्दामच ती असं म्हणाली
कारण…
जाताना तीच्या
पापण्यांची झालर
ओलसर झाली होती
ती गेली तशीच
पण शेवटची भेट देऊन
अश्रूंनी भरलेली
ती कातरवेळ….
तीच्या ही नकळत
दररोज आता तेच घडतं
कातरवेळ झाली की
नकळत पाय तिकडे वळतात
त्या जागेवर जातात
तीची छवी ते बोल
जसेच्या तसे आठवतात
मग डोळयांतून
काहीतरी तराळत
त्याच्या
आणि
त्या कातरवेळेच्याही.
-------------------------------------------------------------------
कवी : निलकवी
ती कातरवेळ ……
तीच लग्न होत
दोन दिवसानंतर
म्हणून ती आलेली
शेवटच्या भेटीसाठी
त्या कातरवेळी
प्रेमाची गाठ सोडण्यासाठी
त्याला म्हणाली ती
झालं गेलं विसरून जा
तुझं माझ्यावर
माझं तूझ्यावर
जे प्रेम होतं
ते सगळ खोट होतं.
तो सुन्न.
ती कातरवेळ सुन्न.
बोलताना सार कडवट बोलून गेली
त्याला माहित होत
त्याने तीचा तिरस्कार करावा
म्हणून मुद्दामच ती असं म्हणाली
कारण…
जाताना तीच्या
पापण्यांची झालर
ओलसर झाली होती
ती गेली तशीच
पण शेवटची भेट देऊन
अश्रूंनी भरलेली
ती कातरवेळ….
तीच्या ही नकळत
दररोज आता तेच घडतं
कातरवेळ झाली की
नकळत पाय तिकडे वळतात
त्या जागेवर जातात
तीची छवी ते बोल
जसेच्या तसे आठवतात
मग डोळयांतून
काहीतरी तराळत
त्याच्या
आणि
त्या कातरवेळेच्याही.
-------------------------------------------------------------------
कवी : निलकवी
0 comments: